Pragati Baburao Prabhe

I have done MA from Pali and work as Visiting Faculty in Pali Department. I think my spiritual journey started because of my spiritual interest since childhood. Because there were many questions in my mind. Who am I? Why am I like this? How can we see with our eyes, How can we hear, Why do I have ears, nose, eyes, other organs, How do thoughts come, What is nature, Why are these animals like that, How do birds fly Why are we? Can't do that. With many such questions, who was the Buddha, why do we take Pancha Shila, what does it mean? Trying to get an answer from the family, but the mind was saying that there is much beyond this. So, I read Buddha and His Dhamma, read Milind Panha. And thought the Buddha has said a lot that we don't know.

In 2009, when I did the first 10-day course at Vipassana, I thought that I would get the right answers from here, so I started learning Pali language. Now I started getting answers to my questions through study, but the experience was still not what I wanted.

In 2021, I took an online 10 days metta meditation course from venerable sister Khema and venerable Bhante Dhammagavesi, from where my spiritual journey took a different turn. In this online retreat I will actually experience what Sati Sampajanya is all about. I never thought online meditation could be like this. And my approach to meditation changed.

I began to know what the mind was like, how it worked, and how the mind should be used. How to increase the good things in yourself, how to remove the bad things

I was able to learn this from 6 R. I could actually experience the answers to many questions related to my existence, at the same time the perspective of others changed, it became easier to understand the feelings of others along with my own nature.

As told by the sages, one could feel how Dhamma exists in every particle of creation. While working, talking, thinking, walking, sitting, getting up, eating, sleeping, overall I understood how to meditate. Just as important as the number of times you sit in meditation is knowing how to do each moment after rising from meditation. Although online meditation, I could feel my progress in meditation as I followed the instructions given by venerable Bhante Dhmmagavesi and venerable sister Khema properly.

And the offline retreats just now started getting deeper answers and the metta meditation roots can be experienced with a lot of learning. And many questions will be answered in my path of Dhamma.

I express my gratitude to Buddha, Dhamma, Sangha as well as venerable Bhante Vimalaramsi, Venerable Bhante Dhammagavesi, Venerable sister Khema, Venerable Bhante Anand, Venerable Bhante Mettananda, and Delson Sir, Goenka Guruji, and all the pathfinders for this right guidance.

Thank you,

प्रगती बाबुराव प्रभे.

मी पालीमधून ma केले आहे आणि पाली विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करते . मला वाटते लहानपणापासून माझ्या आध्यात्मिक आवडीमुळे माझा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला.

कारण माझ्या मनात अनेक प्रश्न होते. मी कोण आहे?, मी अशीच का आहे?, आपण आपल्या डोळ्यांनी कसे पाहू शकतो, आपण कसे ऐकू शकतो, मला कान, नाक, डोळे, इतर अवयव का आहेत, विचार कसे येतात, निसर्ग काय आहे, हे का आहेत? असे प्राणी, पक्षी कसे उडतात आपण का आहोत? असे अनेक प्रश्न असताना, बुद्ध कोण होते , आपण पंचशिला का घेतो, याचा अर्थ काय? घरच्यांकडून उत्तर मिळवण्याचा प्रयत्नहि  केला, पण मन सांगत होतं की यापलीकडेही खूप काही आहे. म्हणून मी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला, मिलिंद पन्हा वाचला. आणि वाटले की बुद्धाने बरेच काही सांगितले आहे जे आपल्याला माहित नाही.

2009 मध्ये जेव्हा मी विपश्यनेचा पहिला 10 दिवसांचा कोर्स केला तेव्हा मला वाटले की इथून मला योग्य उत्तरे मिळतील, म्हणून मी पाली भाषा शिकण्यास सुरुवात केली. आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरे अभ्यासातून मिळू लागली, पण अनुभव अजूनही आले नव्हते।

2021 मध्ये, मी आदरणीय भगिनी खेमा आणि आदरणीय भन्ते धम्मगावेसी यांच्याकडून ऑनलाइन 10 दिवसांचा मेत्ता  मेडिटेशन कोर्स घेतला, तेथून माझ्या आध्यात्मिक प्रवासाला वेगळे वळण मिळाले. या ऑनलाइन रिट्रीटमध्ये मी सती संपजन्‍य म्हणजे काय याचा अनुभव घेतला . ऑनलाइन ध्यान असे असू शकते असे मला कधीच वाटले नव्हते. आणि माझा ध्यानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

मन कसं असतं, ते कसं चालतं, मनाचा वापर कसा व्हायला हवा हे कळायला लागलं. स्वतःमधील चांगल्या गोष्टी कशा वाढवायच्या, वाईट गोष्टी कशा दूर करायच्या मला हे 6 R पासून शिकता आले. मला माझ्या अस्तित्वाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्षात अनुभवता आली, त्याच वेळी इतरांचा दृष्टीकोन बदलला, माझ्या स्वभावाबरोबरच इतरांच्या भावना समजून घेणे सोपे झाले.

ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे, सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये धम्म कसा अस्तित्वात आहे हे अनुभवावरून जाणले।   काम करताना, बोलतांना, विचार करताना, चालताना, बसताना, उठताना, जेवताना, झोपताना, एकंदरीत ध्यान कसे करावे हे समजले. बसून कितीही वेळ मेडिटेशन करणे जितके गरजेचे आहे तितकेच मेडिटेशन मधून उठल्यानंतर प्रत्येक क्षणी अनुभता येते . जरी ऑनलाइन मेडिटेशन करत  असले तरी, पूज्य भंते धम्मगवेसी आणि आदरणीय भगिनी खेमा यांनी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केल्यामुळे मी ध्यानात माझी प्रगती अनुभवू शकले .

आणि आताच केलेल्या  ऑफलाइन रिट्रीट्स मुळे आणखी प्रश्नाच्या खोलवर जाऊ शकली। यापुढेही मेत्ता मेडिटेशन मुळे  धम्माच्या मार्गात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

बुद्ध, धम्म, संघ तसेच पूज्य भन्ते विमलारामसी, आदरणीय भन्ते धम्मगावेसी, पूज्य भगिनी खेमा, आदरणीय भन्ते आनंद, पूज्य भन्ते मेत्तानंद, आणि डेलसन सर, गोयंका गुरुजी आणि या मार्गात  योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्ग दात्यांप्रती  कृतज्ञता व्यक्त करते .

धन्यवाद,